बारामतीतील घरफोडी दोनच दिवसांच्या तपासात उघड!

बारामती, 1 डिसेंबरः बारामती शहरामधील आमराई भागतील चव्हाण चाळच्या शक्ती चेंबर येथील एका घरात 29 नोव्हेंबर 2022 रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास घरफोडीची घटना घडली. घरफोडी करणाऱ्या चोराने संबंधित घरातील दरवाजा, कपाट उचकटून घरातील पैसे आणि ऐवजावर डल्ला मारला. सदर घटनेबाबत निता चव्हाण यांनी बारामती शहर पोलिसात सकाळी फिर्याद दिली.

दिलेल्या फिर्यादीत घरफोडीत अज्ञात चोराने खालील प्रमाणे पैसे आणि ऐवज चोरून नेला.
– 500 रुपयांच्या तब्बल 16 नोटा असे रोख 8 हजार रुपये
– तब्बल 61 हजार 80 रुपये किमतीचे एक तोळा अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, त्यात एक वाटी व 12 खरबुजाचे सोन्याचे मन्यातील व कळ्या मनातील गंठण
– तब्बल 20 हजार 177 रुपये किमतीचे चार ग्रॅम दहा मिली वजनाचे पिवळ्या सोन्याची अंगठी
– 3 हजार 500 रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची लहान मुलाची डिझाईनची सोन्याची अंगठी
– 1 हजार 200 रुपये किमतीचे एक चांदीचे ब्रेसलेट डिझाईनचे व साखळीचे
– 600 रुपये किमतीचे एक चांदीचे डिझाईनची लहान मुलाची अंगठी
– 4 हजार 800 रुपये किमतीची तीन नग नाकातील नथ सोन्याचे तारेतील
– पायातील 3 हजार रुपये किमतीचे चार जोडी चांदीचे
– 15 हजार 300 रुपये किमतीचे अडीच ग्रॅमच्या सोन्याच्या कानातील रिंगा डिझाईनच्या
– 4 हजार रुपये किमतीची कमरेची चांदीची साखळी असे तब्बल 1 लाख 21 हजार 657 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ऐवज चोरून नेला.

फिर्यादी निता चव्हाण यांनी तक्रार दिल्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 457,380 प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल केला. त्यानंतर सदर घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांच्यासह भेट दिली. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ तपासी अधिकारी व पुणे शोध पथकाला रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांना तपासण्याचे आदेश दिले.

भारतीय वायुसेनेचे चेतक हेलिकॉप्टरचे बारामतीत इमर्जन्सी लँडिंग!

संशयित गुन्हेगारांची तपासणी करीत असताना बारामती शहर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी सचिन जवारे (रा.वडकेनगर, बारामती) यावर संशय आला. मात्र संबंधित संशयित आरोपी गेले काही दिवस काही वर्ष निष्क्रिय होता. संशयित आरोपी सचिन जवारे यास शहर पोलीस ठाण्यास आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदर संशयित आरोपीला बारामती येथील न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने संबंधित संशयित आरोपीस तीन दिवस पोलीस कोठडीत पाठवले.

दरम्यान सदर आरोपीकडून संबंधित घरफोडीत चोरी झालेले दागिने हस्तगत करण्यात आले आहे. या संबंधित संशयित आरोपीने आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का, याबाबत शहर पोलिसांचा तपास सुरू आहे. संबंधित संशयित आरोपीवर पूर्वीचे सहा गुन्हे दाखल आहेत. यात जबरी चोरी, घरपोडी आदींचा समावेश आहे. सदर घरफोडीत चोरीला गेलेले दागिने तात्काळ मिळाल्याने संबंधित महिलेने शहर पोलिसांचे आभार मानले आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, कुलदीप संकपाळ, तपासी पथकाचे पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस नाईक तुषार चव्हाण, पोलीस अंमलदार सिताब राणे, जामदार इंगवले यांनी केले आहे.

बारामतीत ‘या’ निवडणुका होणार चुरशीची!

One Comment on “बारामतीतील घरफोडी दोनच दिवसांच्या तपासात उघड!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *