बारामती, 1 डिसेंबरः राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बारामती तालुक्यातील तब्बल 13 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. यात मोरगाव, वाघळवाडी, पणदरे, मुरुम, वाणेवाडी, गरदडवाडी, सोरटेवाडी, कुरणेवाडी, सोनकसवाडी, काऱ्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी आणि पळसी या गावांचा समावेश आहे.
बारामतीत तीन दिवसीय रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण
मात्र या निवडणुकीत बारामती तालुक्यातील वाघळवाडी आणि गरदडवाडी ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत सरपंचपद जनतेतून असल्याने अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सरपंचपद खेचून आणण्यासाठी कंबर कसली आहे. सध्या वाघळवाडी व गरदडवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये प्रचंड रस्सीखेच पहायला मिळणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.
बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावात मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था, कॉलेज व लहान-मोठ्या कंपन्या, कारखाना व मोठी बाजारपेठ आहे. यामुळे ही निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जाते. आजअखेर बारामती तालुक्यातील सरपंच पदासाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यातील एकट्या वाघळवाडीतून 4 तर पणदरे येथून 5 सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर, वाणेवाडी एकही अर्ज दाखल झालेला नाही.
उसाने भरलेला ट्रॅक्टर शिरला मंदिरात!
2 Comments on “बारामतीत ‘या’ निवडणुका होणार चुरशीची!”