पुणे, 29 नोव्हेंबरः नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘बहुविद्याशाखीय केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णय अंतर्गत बहुविद्याशाखीय ज्ञान निर्मिती करणे, तसेच संशोधनावर भर दिला जाणार आहे. यासह श्रेयांक आधारित अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून बहुविद्याशाखीय केंद्र कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.
बारामतीत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू!
या केंद्राच्या स्थापनेचा उद्देश हा सध्याच्या प्रचलित एकल विषयाच्या ज्ञानात्मक मर्यादा ओलांडून अनेक विषयांचे ज्ञान एकत्र करणे आणि समस्यांवर उपाय शोधणे, असा आहे. तसेच आंतरविद्याशाखीय ज्ञान निर्मिती करणे, या ज्ञानाचे समस्या निराकरणासाठी उपयोजन करणे, कोणत्याही एका विद्याशाखेत अडकून न पडता विविध विद्याशाखांच्या ज्ञानांचे एकत्रीकरण करणे, बहुविद्याशाखीय ज्ञान निर्मिती करणे, उपयोजन यासाठीचे संशोधक निर्माण करणे या केंद्राची उद्दिष्टे असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी माध्यमांना दिली.
चाकूचा धाक दाखवत सरपंचाच्या घरीतील 10 लाखांवर डल्ला!
जगातील कोणतीही समस्या एका ज्ञानाआधारे सोडवता येत नाही. विविध विषयांची त्यासाठी गरज असते. त्यामुळे विविध क्षेत्रातील, विद्याशाखांतील तज्ज्ञांना बहुविद्याशाखीय केंद्राअंतर्गत एकत्र आणण्यात येणार आहे. त्याद्वारे तंत्रज्ञान, भाषा, माहितीशास्त्र, संप्रेषण अशा विविध विद्याशाखांशी संबंधित अभ्यास, संशोधन करणे या केंद्राद्वारे शक्य होणार आहे. या केंद्रासाठी अभ्यास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. तसेच शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचेही माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली आहे.
One Comment on “पुणे विभागात बहुविद्याशाखीय केंद्र कार्यान्वित होणार”