बारामतीत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू!

बारामती, 28 नोव्हेंबरः राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बारामती तालुक्यात एकूण 13 ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

प्रेयसीच्या भावाचा आणि आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला

यात तालुक्यातील मोरगाव, वाघळवाडी, पणदरे, मुरुम, वाणेवाडी, गरदडवाडी, सोरटेवाडी, कुरणेवाडी, सोनकसवाडी, काऱ्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी व पळसी अशा एकूण 13 ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

चाकूचा धाक दाखवत सरपंचाच्या घरीतील 10 लाखांवर डल्ला!

28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बारामती तहसिल कार्यालय येथे नामनिर्देशन फॉर्म दाखल करता येतील. हे फॉर्मस ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे लागणार आहेत. सरपंच पदासाठी आज, सोमवारी, मोरगाव येथील 2, वाघळवाडीचे 4, व पणदरे येथील 2 तर सदस्य पदासाठी मोरगाव येथील 1 आणि पणदरे येथील 3 असे एकूण 12 फॉर्मस दाखल झाल्याची माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली आहे.

2 Comments on “बारामतीत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *