बारामती, 28 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील चोपडज येथील सरपंचाच्या घरावर चोरांनी जबरी चोरी केली आहे. सरपंचाच्या घरी चोरांनी चाकूचा धाक दाखवत तब्बल 15 तोळे सोने आणि तब्बल 85 हजार रुपयांची रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे. सदर घटना ही आज, 28 नोव्हेंबर 2022 रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर सरपंच जगताप यांनी वडगांव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
BPL-4 चा भापकर 007 बनला नवा किंग!
दरम्यान, घरात मंगल कार्य असल्याने सरपंच जगताप यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे मंगल कार्यालयात कार्यक्रमासाठी गेले होते. सरपंच जगताप ह्या घरात एकट्या असल्याचा फायदा घेत आज, सोमवारी रात्री 2 ते 2.30 च्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. त्यानंतर सरपंच जगताप यांना चाकूचा धाक दाखवत अंदाजे 15 तोळे सोने आणि 85 हजार रुपयांची रोख रक्कमेवर हात साफ केला.
सदर घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळाला तात्काळ भेट दिली. तसेच बारामती उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, घटनास्थळी अधिक तपासासाठी श्वान पथकालाही पाचरण करण्यात आले होते. या बाबतचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
बारामतीत आढळली दुर्मिळ जातीची बिबट्यासदृश्य प्राण्याची पिल्ले
2 Comments on “चाकूचा धाक दाखवत सरपंचाच्या घरीतील 10 लाखांवर डल्ला!”