भाजप युवा मोर्चाकडून संविधान दिन साजरा

बारामती, 27 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील खताळपट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. हा संविधान दिन भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने साजरा करण्यात आला.

खंडूखैरेवाडीतील विद्यार्थ्याची कुस्ती स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खताळपट्टा येथे संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पोलिसांकडून सामुहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन

यावेळी भाजपायुमो बारामती शहर मंडल अध्यक्ष विक्रम थोरात, सरपंच लक्ष्मीबाई बोरकर, उपसरपंच राहुल कोळेकर, सदस्य बाळासाहेब बोरकर, संजय टकले, मुख्याध्यापक मोमीन सर यासह शिक्षक उपस्थित होते.

One Comment on “भाजप युवा मोर्चाकडून संविधान दिन साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *