दौंड, 17 नोव्हेंबरः दौंड शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 20 ते 22 जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. मागील काही दिवसांपासून हा पिसाळलेला कुत्रा दौंड परिसरात फिरत होता. त्यावेळी रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या 20 ते 22 जणांना चावा घेतला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दौंड नगर पालिकेकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
बारामतीत धुडगूस घालणाऱ्या गँगच्या म्होरक्या अटक!(व्हिडीओ)
जखमींमध्ये अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. दौंड शहरातील एसआरपी कॅम्पमध्ये म्हसोबाची यात्रा सुरु आहे. या यात्रेमध्ये पिसाळलेल्या कुत्रा शिरल्याने अनेकांना चावा घेतला. त्यामुळे दौंड नगरपालिकेकडून पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरु आहे. कुत्रा चावल्याने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
कुत्र्याने चावा घेतल्याने अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती आणि रक्तस्त्राव देखील झाला होता. त्यांच्यावर योग्य उपचार वेळेत सुरु केले आहेत. जखमींना टीटीचे इंजेक्शन देण्यात आलं आहे. प्राथमिक उपचार करुन त्या सर्व रुग्णांवर आता उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
One Comment on “पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 22 जणांना चावला”