बारामतीत सरकारी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू

बारामती, 13 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- दया दामोदरे) बारामती तालुक्यातील गोखळी येथून अक्षय साधू धुमाळ (वय 18) या तरुणाला 12 नोव्हेंबर 2022 रोजी सर्पदंश झाला. सर्पदंशानंतर अक्षय धुमाळला बारामती येथील सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल येथे उपचारार्थ आणण्यात आले.

दरम्यान, सुरुवातीला अक्षयला साप चावल्याचे कळले नसल्याने त्याला उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याला सिल्व्हर ज्युबली रुग्णालयामध्ये आणण्यात आले. सिल्व्हर ज्युबली येथे प्राथमिक उपचार केले. त्यानंतर अक्षयला बारामती येथील महिला हॉस्पिटल येथे हलविण्यात आले.

मुंबई-पुणे मार्गावर भीषण अपघात; महिला ठार

महिला हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र बराच वेळ त्याच्याकडे कोणत्याही डॉक्टर आणि नर्सने कोणत्याही प्रकारे लक्ष दिले नाही. त्यामुळे बराच वेळ उपचार अभावी निघून गेला. त्यामुळे अक्षय धुमाळ याची परिस्थिती गंभीर झाली. त्यामुळे त्याला ससून रुग्णालयात घालवण्याचा सल्ला दिला. अक्षयचे वडील साधू धुमाळ याने वेळेचे गांभीरे बघून त्याला बारामतीतील बहुत हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र बहुत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना अक्षयचा मृत्यू झाला.

बारामतीत मराठा विद्यार्थ्यांना जिजाऊ शिष्यवृत्ती वाटप

बारामती शासकीय सिल्व्हर ज्युबली रुग्णालय येथे अक्षयला तात्काळ उपचार मिळाले नाही, तसेच डॉक्टरांनी उपचार करण्यात दिरंगाई केल्यामुळेच अक्षयचा मृत्यू झाला, असे अक्षयचे वडील साधू धुमाळ यांनी ‘भारतीय नायक’च्या पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांवर तात्काळ कारवाई व्हावी, असे मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *