पुणे, 13 नोव्हेंबरः मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिट पॉइंट जवळ शनिवारी, 12 नोव्हेंबर 2022 रोजी हा अपघात झाला. हा अपघात कार डिव्हाईडरला धडकल्याने झाला. अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
बारामतीत मराठा विद्यार्थ्यांना जिजाऊ शिष्यवृत्ती वाटप
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट येथे हा अपघात झाला. यात कार अक्षरशः डिव्हाईडरमध्ये घुसली. हा अपघात इतका भयंकर होता की, एक महिला जागीच ठार झाली, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. या दोघांनाही पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल इथे नेण्यात आले. सुप्रिया किसन माने (वय 30, रा. कल्याण) ही महिला या अपघातात मृत पावली असून शेखर शिंदे (वय 31, रा. भिवंडी) हे जखमी झाला आहे.
One Comment on “मुंबई-पुणे मार्गावर भीषण अपघात; महिला ठार”