बारामती, 9 नोव्हेंबरः नुकताच मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या नीट परीक्षेत प्रज्योत साबळे याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत खडतर परिश्रम घेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या नीट परीक्षेत प्रज्योतला 700 गुणांपैकी 615 गुण मिळाले असून त्याने राज्यात 16 वा क्रमांक मिळाविला आहे. तसेच एस सी कॅटेगिरीतून प्रज्योत साबळे पुणे जिल्ह्यात प्रथम आला आहे.
प्रज्योत साबळे यांचा पुण्यातील नामांकित शासकीय बीजे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळाला आहे. या उज्वल यशाबद्दल समाजबांधव, मित्र परिवार आणि कुटुंबियांच्या वतीने बारामती येथील दूध संघातील शरद सभागृहात रविवारी, 6 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. या सत्कार कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रज्योतचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे, मुख्याध्यापक भिवा जगताप सर, आरपीआयचे पुणे जिल्हा सचिव सुनिल शिंदे तसेच इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. यासह प्रज्योतचे आजोबा विलास साबळे (गुरुजी), रेखा साबळे, वडिल अनिल साबळे, आई सत्वशिला साबळे यासह चुलते, चुलती, आत्या, सामाजित कार्यकर्ते, पत्रकार, मित्र परिवार आदी उपस्थित होते.
One Comment on “दैदिप्यमान यशाबद्दल प्रज्योत साबळेचा जाहीर सत्कार!”