जेजुरी- बारामती मार्ग बनला अपघातांचा सापळा

बारामती, 6 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील मोरगाव- बारामती या जिल्हा मार्ग क्रमांक 65 वर सातत्याने अपघात मालिका सुरुच आहे. आज, 6 नोव्हेंबर 2022 रोजी काऱ्हाटी पाटी येथे रस्ता ओलंडणाऱ्या एका 54 वर्षीय महिलेला भरधाव अल्टो गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात सदर महिला गंभीर जखमी झाली आहे.

फळबागासंदर्भात कृषि विभागाचे आवाहन

जेजुरी बारामती हा गुळगुळीत रस्ता पादचारी आणि वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. महिनाभरात सिमलेस कंपनीनजीक काळाओढा येथे एक, आणि फोंडवाडा येथे तीन अशा एकूण चार व्यक्त्तींचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटना ताज्या असतानाच बारामती तालुक्यातील काऱ्हाटी पाटी येथे आज, रविवारी सकाळी 8 च्या दरम्यान भरधाव अल्टो गाडीने रस्ता ओलंडणाऱ्या महिलेस उडविले.

बारामती आगारातील 9 जणांवर मोठी कारवाई

स्थानिकांच्या मदतीने सदर महिलेला पुढील उपचारासाठी बारामती येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. मोरगाव- बारामती या मार्गावर या सारख्या वारंवार होणाऱ्या अपघाताची मालिका थांबण्यासाठी गावच्या ठिकाणी गतीरोधक करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. मात्र राजकीय हट्टापायी गतीरोधकास अडथळा होत असल्याची संतप्त भावना ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

One Comment on “जेजुरी- बारामती मार्ग बनला अपघातांचा सापळा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *