फळबागासंदर्भात कृषि विभागाचे आवाहन

बारामती, 4 नोव्हेंबरः महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बारामती उपविभागास फळबाग लागवड योजनेसाठी 901 हेक्टर फळपिके लागवडीचे लक्षांक दिले आहे. ऑक्टोबर 2022 अखेर 1 हजार 410 हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना प्रशासकीय मान्यता व 1 हजार 424 हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना तांत्रिक मंजूरी मिळाली आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सलग क्षेत्रावर फळबाग व बांधावर फळझाडे लागवडीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित गावातील कृषि सहाय्यकाकडे अर्ज करावा, असे आवाहन बारामती उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

बारामतीतील दोन सराईतांवर तडीपारची कारवाई

सदर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, का.लिंबू, संत्रा, मोसंबी, सिताफळ, नारळ, आवळा, अंजीर, जांभुळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगनफ्रुट, अ‍ॅव्हाकॅडो, केळी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. तसेच गुलाब, मोगरा आणि निशीगंध या फुलपिकांच्या लागवडीसाठी सुध्दा परवानगी देण्यात आलेली आहे. अकुशल कामगारांना 256 रुपये प्रति दिन प्रमाणे मजुरीदर आहे.

बारामतीत दोन दिवसीय गणस्तरीय कार्यशाळा

रासायनिक खतांचा खर्च अर्थिक मापदंडातून वगळण्यात आला आहे. त्याऐवजी नाडेप कंपोस्ट व गांडुळ खताचा अधिक वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान व फळपीक लागवडीचे निकष विद्यापीठ शिफारशीनुसारच मर्यादित राहील. अतिरीक्त कलमे/रोपे यांचे अनुदान देय राहणार नाही.

लागवड वर्षासह सलग 3 वर्षात मंजुर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहील. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती फळपिकांकरीता जे लाभार्थी 90 टक्के फळझाडे जिवंत ठेवतील व कोरडवाहू फळपिकांकरीता 75 टक्के फळझाडे जिवंत ठेवतील, अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील. वैयक्तिक बांधावरील फळपिके लागवडीसाठी हेक्टरी 20 रोपे या मर्यादेत फळपिकांची लागवड ही योजना राबविण्यात येत असून यासाठीदेखील अनुदान देय आहे.

2 Comments on “फळबागासंदर्भात कृषि विभागाचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *