बारामती, 3 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे ‘आमचा गाव आमचा विकास’ ही गणस्तरीय कार्यशाळा 2 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाली. ही कार्यशाळा बारामती पंचायत समितीमार्फत दोन दिवस घेण्यात आली. सदर कार्यशाळा मोठा उत्साहात पार पडली.
माळेगावात ताडी विक्री विरोधात मोर्चा
या कार्यशाळेत बारामती तालुक्यातील सुपे, मेडद, शिर्सुफळ, गुणवडी, माळेगाव बुद्रुक, पणदरे, वडगाव निंबाळकर, मोरगाव, निंबुत, सांगवी, डोर्लेवाडी या गणातील सर्व गावांमधील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसंसाधन गट (ग्रामपंचायत) स्तरावरील सर्व कर्मचारी, स्वयं सहाय्यता बचत गट, अंगणवाडी सेविका, ग्रामबल संरक्षण समितीचे सदस्य, समूह संसाधन व्यक्ती उपस्थित होते.
बारामती प्रशासनातील सेक्स दलाल!
या कार्यक्रमासाठी प्रभारी अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितीबाबत प्रभारी अधिकारी, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व तालुका अभियान व्यवस्थापक यांनी संयुक्तपणे नियोजन करून दैनंदिन अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती बारामती पंचायत विभाग यांच्याकडे सादर केला. या कार्यशाळेत शिर्सुफळ, गाडीखेल, पारवडी, निंबोडी, कटफळ, जैनकवाडी, वंजारवाडी, सावळ, साबळेवाडी या गावांतील ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्य उपस्थित होते.
One Comment on “बारामतीत दोन दिवसीय गणस्तरीय कार्यशाळा”