बारामतीत राष्ट्रीय एकता दिवस साजरा

बारामती, 1 नोव्हेंबरः बारामती शहरात नगर परिषदेमार्फत स्वातंत्र्य सेनानी वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर 2022 रोजी जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून देशभर साजरा केला जात आहे. राष्ट्रीय एकता आणि आझादी का अमृत महोत्सवाचा संदेश देशभरात पोहोचवण्याच्या उद्देशाने बारामती नगरपरिषदेमार्फत राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रम घेण्यात आला.

एलपीजी गॅस सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त!

सदर एकता दौड बारामती नगरपरिषद ते पंचायत समिती बारामती यामार्गे घेण्यात आला. यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यासह नगर परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच जय जवान माजी सैनिक संघटनेचे सदस्य, गणेश मंडळ सदस्य उपस्थित होते.

माळेगाव ताडी प्रकरणात मोठी अपडेट

या एकता दिवसानिमित्त सर्वांनी राष्ट्रीय एकता शपथ घेऊन स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आपल्या राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी व बळकट करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमाणसात दिला.

One Comment on “बारामतीत राष्ट्रीय एकता दिवस साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *