इंदापुरात रानगव्यांचं दर्शन?

इंदापूर, 1 नोव्हेंबरः इंदापूर तालुक्यातील काही भागात सध्या जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. इंदापूर तालुक्यातील कांदलगाव आणि तरटगाव येथील परिसरात रविवारी, 30 ऑक्टोबर 2022 रोजी एक रानगवा आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मध्यंतरी लोणी देवकर परिसरातील एका विहिरीमध्ये मगर आढळून आली होती. तालुक्यात यापूर्वी देखील बिबट्या, मगर आदींसह जंगली प्राणी आढळून आले होते.

बानप ठेकेदाराकडून अनुसूचित जातीच्या महिलांचा लैंगिक शोषण?

उजनी धरणाच्या पायथ्याशी या पट्ट्यात अनेक शेतकर्‍यांची शेती आहे. तेथे अनेकांचे गोठे आहेत. रानगवा अचानक जनावरांच्या कळपात दाखल होतो. वेळप्रसंगी तो शेतकर्‍याच्या अंगावर ही धावून येतो. रानगवा शेतकर्‍यांच्या चारा पिकांसह इतर पिकाचे ही नुकसान करीत असल्याने वन विभागाने तत्काळ याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक शेतकर्‍यांनी केली आहे.

पुढील तीन दिवस शरद पवारांवर केला जाणार उपचार

अद्याप तरी या जंगली रानगव्यांनी शेती तसेच माणसांना कसलीही इजा केली नसल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. स्थानिकांनीदेखील या रानगव्यांपासून दूर राहावे आणि रानगवे आढळून आल्यास त्यांना त्रास देऊ नये. शेतातील काही पिकांचे नुकसान केल्यास झालेल्या नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामा करून अहवाल पाठवण्यात येईल. स्थानिकांनी घाबरू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

One Comment on “इंदापुरात रानगव्यांचं दर्शन?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *