बारामती, 1 नोव्हेंबरः बारामती नगर परिषद मधील कामगार ठेकेदारांचा सुपरवायझर मागासवर्गीय महिलांचे शारीरिक सुखाची मागणी करत आहे, अशी चर्चा महिला कामगारांमध्ये आहे. याबाबत मुख्य अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रार केली. याबाबत लेखी तक्रार करा, असे मुख्याधिकाऱ्यांकडून कामगारांना सांगण्यात आले.
पुढील तीन दिवस शरद पवारांवर केला जाणार उपचार
इतक्या संवेदनशील घटनेत गोपनीयता न पाळता अनुसूचित जाती महिलांची इज्जत काढण्यासाठी सदरची चर्चा घडवून आणली जात आहे. फिर्याद देण्यास पुढे येऊ नये, म्हणून प्रशासन आणि राजकीय सत्ताधारींचे प्रयत्न चालू आहे. आर्थिक देवाण-घेवाण व राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा मागासवर्गीय विभागात चालू आहे.
बारामतीत कापूस विक्री पुन्हा होणार सुरु
सदर ठेका हा मोठ्या पुढाऱ्याशी संबंधित आहे. यामुळे ठेकेदाराच्या सुपरवायझरला आणि ठेकेदाराला वाचवण्यासाठी फोना-फोनी चालू आहे. तसेच या प्रकरणात सामाजिक दलालांमध्ये आर्थिक लाभासाठी पळापळी चालू असल्याचे चित्र आहे.
One Comment on “बानप ठेकेदाराकडून अनुसूचित जातीच्या महिलांचा लैंगिक शोषण?”