बारामती, 29 ऑक्टोबरः समदृष्टिच्या भावनेचे दर्शन घडविणाऱ्या 75व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा शुभारंभ 16 नोव्हेंबर 2022 रोजी होत आहे. हा समागम 20 नोव्हेंबर पर्यंत संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा ग्राउंड (हरियाणा) येथे आयोजित केला जात आहे. संत समागमाची पूर्व तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. 75वा वार्षिक निरंकारी संत समागम स्वयमेव एक ऐतिहासिक व अनोखा आहे. या दिव्य संत समागमांच्या अविरत श्रृंखलेने आजवर 74 वर्षे यशस्वी रित्या पूर्ण केली आहेत.
सार्थक फौंडेशनची 110 मुलांसोबत दिवाळी साजरी
या वर्षी 75व्या वार्षिक निरंकारी संत समागमात बारामतीसह देशभरातून तसेच विदेशातून मोठ्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी होतील. समागम स्थळावर भव्य सत्संग पंडालच्या व्यतिरिक्त अधिक संख्येने निवासी टेंट उभारण्यात येत आहेत. ज्यामध्ये बाहरून येणाऱ्या भक्तगणांची राहण्याची तसेच लंगर (भोजन) आदींची उचित व्यवस्था असेल. शिवाय प्रत्येक मैदानावर स्वतंत्र कैन्टीनची सुविधा दिली जाणार आहे. त्यामध्ये अल्पोपहार आदी सवलतीच्या दराने उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त मैदानांवर स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्या बरोबरच पार्किग, सुरक्षा देखील समुचित व्यवस्था केली जात आहे.
बारामतीत पालखी मार्गाची टक्केवारी??
या दिव्य संत समागमात सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी भारतीय रेलवे द्वारे आध्यात्मिक स्थळ समालखा याच्या निकट असलेल्या भोडवाल माजरी रेलवे स्टेशनवर येथून जाणाऱ्या जवळ जवळ सर्व गाड्या थांबवण्याची अनुमती दिली गेली आहे. या सुविधमुळे रेल्वेने समगमला जाणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे.
One Comment on “निरंकारी संत समागम पूर्व तयारी अंतिम टप्प्यात”