गोविंदबागेत कार्यकर्त्यांची तुफान गर्दी!

बारामती, 26 ऑक्टोबरः दिवाळीच्या पाडव्या दिवशी खास शरद पवार यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच नागरीक हे दरवर्षी बारामती येथील गोविंद बागेत येत असतात. याही वर्षी गोविंद बाग कार्यकर्त्यांनी फुलल्याचे चित्र होते. आज, 26 ऑक्टोबर 2022 रोजी पाडव्यानिमित्त शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी राज्यातून मोठी गर्दी झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांच्या मोठ्याच मोठ्या रांगा लागल्या होत्या. शेकडो वाहनांची दुतर्फा गर्दी झाली होती. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यंदा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पवार कुटुंबाला भेटण्यासाठी हजेरी लावल्याचे चित्र होते.

सुप्यात वंचितांना दिवाळी फराळ वाटप

यावेळी शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, शरयु कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार हे आज, बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासुन शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार, पार्थ पवार यांची देखील उपस्थिती दिसली. पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यातील ‘व्हीआयपी’ देखील रांगेत होते. आमदार दत्तात्रय भरणे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार यशवंत माने, आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार रमेश थोरात आदी बड्या नेत्यांनी पवारांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

बारामती महिला रुग्णालयात साहित्यांची चोरीला

राज्यभरातुन आलेल्या वाहनांनी तब्बल दोन किलोमीटरवर पार्किंगने भरुन गेले होते. कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास रांगेत थांबले होते. या गर्दीत युवकांची संख्या अधिक असल्याचे दिसले. यावेळी अनेकांना आवडत्या नेत्याबरोबर छायाचित्र, सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

One Comment on “गोविंदबागेत कार्यकर्त्यांची तुफान गर्दी!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *