तरडोलीत तब्बल 222 कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप

बारामती, 24 ऑक्टोबरः यंदा शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दिवाळी गोड होण्यासाठी शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप सर्वत्र करण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील तरडोली येथेही आनंदाचा शिधा वाटप 222 कार्डधारकांना 23 ऑक्टोबर 2022 रोजी सरपंच विद्या भापकर व भाजपाचे पदाधिकारी रविंद्र साळवे, राजवर्धन भापकर यांच्या हस्ते करण्यात आले.

बारामतीत वाढली वाहतूक कोंडी

राज्यातील सर्वसामान्यांची व शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी दीपावलीचे किट सर्व कार्डधारकांना प्रशासनाच्या वतीने वितरित करण्यात येत आहे. तरडोलीतही 222 कार्डधारकांना या दीपावलीचा आनंदाचा शिधा वितरण करण्यात आला.

बारामती शहरात पोलिसांचं ढिसाळ वाहतूक नियोजन

यावेळी गावच्या सरपंच विद्या भापकर, भाजपाचे पदाधिकारी रविंद्र साळवे, राजवर्धन भापकर, हर्षवर्धन भापकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल कदम, भैरवनाथ सोसायटी माजी चेअरमन चंदूभाई तांबोळी, स्वस्त धान्य दुकान चालक दिनेश लेंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

2 Comments on “तरडोलीत तब्बल 222 कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *