बारामतीत सम-विषम पार्किंगला स्थगिती

बारामती, 23 ऑक्टोबरः दिवाळीच्या सणामुळे बारामती शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. व्यापारी वर्गाने केलेल्या मागणीनुसार शहरातील सम विषम पार्किंग व्यवस्थेला काही कालावधीसाठी स्थगिती देण्याचा निर्णय शहर पोलीस स्टेशनकडून घेण्यात आला आहे.

या काळात वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे. बारामती शहरातील भिगवण चौक ते गांधी चौक या मार्गावर पुढील 15 दिवस एकेरी वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे.

वंचितच्या जिल्हा संघटक पदी सुजय रणदिवे यांची निवड

याशिवाय गुणव चौक ते गांधी चौक व तेथून कदम चौक या मार्गावरही एकेरी वाहतूक सुरू राहील. गांधी चौकाकडून भिगवण चौकाकडे व गुणवडी चौकाकडे कोणतीही दुचाकी, चारचाकी सोडली जाणार नाही. समोरासमोर वाहने आल्याने वाहतूक जाम होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. नगर परिषदेने याबाबत फलक लावले आहेत. वाहनचालक, नागरिकांनी या फलकावर दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महाडिक यांनी केले.

One Comment on “बारामतीत सम-विषम पार्किंगला स्थगिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *