लाकडी निंबोडी योजनेचा फेर सर्व्हे होणार

इंदापूर, 21 ऑक्टोबरः इंदापूर तालुक्यातील लाकडी- निंबोडी उपसा जलसिंचन योजनेत दुष्काळी पिंपळे, अकोले ही गावे पुन्हा समाविष्ट करणे तसेच लामजेवाडी, शेटफळगढे, शिंदेवाडी, म्हसोबाचीवाडी, काझड, लाकडी, निंबोडी, निरगुडे या समाविष्ट दुष्काळी गावांमधील वंचित शेतकऱ्यांचे क्षेत्र हे सिंचन योजनेत सामावून घेणे बाबतचा फेर सर्व्हे करून तात्काळ सुधारीत प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे लाकडी- निंबोडी उपसा जलसिंचन योजना ही कुठल्याही परिस्थितीत तातडीने पूर्ण करणारच, अशी ग्वाही भाजप नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

भीमा पाटस सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर सुरु

निरगुडे येथे लाकडी-निंबोडी योजनेच्या फेर सर्वेक्षणाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नुकतीच आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहून हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले. या योजने संदर्भात पुण्यातील सिंचन भवन येथे जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत शनिवारी बैठक झाली. जलसंपदाकडून फेर सर्व्हेचे काम तातडीने काही दिवसांतच पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

ओढ्यात वाहून गेलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्यात यश

युती शासनाच्या काळात कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या सूचनेनुसार मी लाकडी- निंबोडी उपसा जलसिंचन योजनेची कल्पना मांडली. त्यानुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून 13 जुलै 1998 रोजी इंदापूर सिंचन योजना या नावाने योजनेचा आराखडा जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आला. सन 2004 मध्ये योजनेस तत्त्वतः मंजूरी मिळाली. तर 2007 मध्ये प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्यावेळी राज्यपालांकडे सादर केलेल्या महाराष्ट्र कृष्णा खोऱ्यातील प्रस्तावित 52 टीएमसी पाणीसाठ्याच्या वापर करावयाच्या योजनेत या योजनेचा समावेश नसल्याने आणि थेट राज्यपालांकडे अधिकार असल्याने या योजनेस निधी उपलब्ध होऊ शकला नाही, असेही पाटील यांनी नमूद केले.

One Comment on “लाकडी निंबोडी योजनेचा फेर सर्व्हे होणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *