भीमा पाटस सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर सुरु

दौंड, 21 ऑक्टोबरः दौंड तालुक्यातील भिमा पाटस साखर कारखाना भाडेतत्वावर साई प्रिया शुगर (निराणी शुगर्स) या कंपनीला चालवायला दिला आहे. कारखाना या हंगामात सुरू होणार असल्याने शेतकरी आणि कामगार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सहकारी बँकेने भिमा पाटस कारखाना चालविण्यासाठी देण्याचा करार नुकताच झाला आहे.

ओढ्यात वाहून गेलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्यात यश

साई प्रिया शुगर (निराणी शुगर) चे संचालक संगमेश निराणी यांनी गुरुवारी, 20 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी कारखान्यास भेट देवुन संपुर्ण माहिती घेतली. यावेळी कारखान्याचे चेअरमन आमदार राहुल कुल, भिमा पाटसचे माजी व्हॉईस चेअरमन सत्वशिल शितोळे यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. साई प्रिया शुगर (निराणी शुगर) चे संचालक संगमेश निराणी यांनी पाहणी करताना कारखान्याचे कामकाज तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्या दृष्टीने भिमा पाटसच्या कामगारांना लगेच कामावर येण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.

खुनाच्या खटल्यातील आरोपींची निर्दोष सुटका

यावेळी भिमा पाटसचे चेअरमन आमदार राहुल कुल म्हणाले की, राज्य सहकारी बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रसिध्द केली होती. त्यानुसार साई प्रिया शुगरल (निराणी शुगर) ला निविदा मिळाली होती. कारखाना हा सहकारी तत्वावरच सुरू राहणार आहे. साई प्रिया शुगर (निराणी शुगर) यांना कारखान्यासाठी पुर्ण सहकार्य करणार आहे. यावेळी पाहणी करताना कारखान्याचे माजी व्हॉईस चेअरमन सत्वशील शितोळे यांनीही कारखाना लवकर सुरू करा. त्यासाठी आमच्याकडून जे सहकार्य हवे असल्यास ते आम्ही करु, असे आश्वासन त्यांनी दिले.

2 Comments on “भीमा पाटस सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर सुरु”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *