बारामतीत ओढ्याच्या पाण्यात दुचाकीस्वार गेला वाहून

बारामती, 20 ऑक्टोबरः बारामती तालुक्यातील मोरगाव- मुर्टी या रस्त्यावरील जाधव वस्ती शेजारील होलनकुंडच्या ओढ्यातून बुधवारी, 19 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री दुचाकीवरील एक अज्ञात व्यक्ती ओढ्यात वाहून गेला असल्याची घटना घडली आहे. संबंधित व्यक्ती वाहून जात असतानाचा पाहिल्याचे येथील स्थानिक व्यक्तीकडू सांगण्यात येत असून त्या व्यक्तीसाठी शोध कार्य सुरू आहे.

खुनाच्या खटल्यातील आरोपींची निर्दोष सुटका

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोरगाव- मुर्टी या रस्त्यावरील जाधववस्ती शेजारी होलनकुंडचा ओढा आहे. या ओढ्यातील पाण्याचा प्रवाह बुधवारी झालेल्या पावसाने पुन्हा वाढू लागला होता. याच दरम्यान एक दुचाकीस्वार ओढ्यात गाडी घालण्याचा प्रयत्न करत असताना येथील हॉटेल मॅनेजरने ‘पाण्याचा प्रवाह जास्त आहे, तू आतमध्ये जाऊ नको’ असे सांगितले. मात्र संबंधित व्यक्तीने न ऐकता पुढे गेला. या हॉटेल मॅनेजरने संबंधित व्यक्ती ओढ्यात वाहून गेला असल्याची माहिती स्थानिक पोलीस पाटील व पोलीस प्रशासनाला दिली.

घटनेची माहीती समजताच वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षण सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक व्यक्तीच्या सांगण्यावरून मुर्टी येथील स्थानिक तरुणांच्या सहाय्याने या दुचाकीचा व वाहून गेलेल्या अज्ञात व्यक्तीचा तपास सुरू केल्याची माहीती पोलीस पाटील गदादे यांनी दिली.

One Comment on “बारामतीत ओढ्याच्या पाण्यात दुचाकीस्वार गेला वाहून”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *