बारामती, 20 ऑक्टोबरः बारामती येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात एका खुनाच्या खटल्यातील आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. सदर खुनाचा खटला न्या. जे. ए. शेख यांच्या न्यायालयात चालू होता. या खुन खटल्यात आरोपींच्या बाजूने अॅड. विवेक बेडके, अॅड. बाबाजान शेख, अॅड. वैभव काळे, अॅड. रियाज खान यांनी युक्तीवाद केला.
पूर्वतयारीसाठी बारामतीसह राज्यातून शेकडों भक्तगण सहभागी
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे 2016 रोजी खुन झााला होता. या खुन प्रकरणात संशयित आरोपी रावसाहेब वाघमोडे, वैंकु वाघमोडे (दोघे रा. माळशिर, जि. सोलापूर), महादेव वाघमोडे (रा. शेळगाव, ता. इंदापूर) यांच्यावर भादवि कलम 302, 307, 326, 323, 405, 406, आर/डब्ल्यु 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
सदर खुनाच्या खटल्यात आरोपींच्या बाजूने अॅड. विवेक बेडके, अॅड. बाबाजान शेख, अॅड. वैभव काळे, अॅड. रियाज खान यांनी जोरदार युक्तीवाद करून फिर्यादी आणि साक्षीदार यांची साक्ष खोटी ठरविली. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद आणि पुरावेअभावी सदरील आरोपींची बारामती अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
One Comment on “खुनाच्या खटल्यातील आरोपींची निर्दोष सुटका”