बानपकडून कऱ्हा नदीवर नागरीकांना आवाहन

बारामती, 18 ऑक्टोबरः पावसामुळे नाझरे धरणात वेगाने पाणी साठा होत आहे. या पाण्यामुळे धरणाच्या सांडव्यात कर्‍हा नदीत सध्या 35250 क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. यामुळे कऱ्हा नदीच्या पाणी पात्रात आज, 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळपासुनच मोठी वाढ झाली आहे.

कऱ्हा नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ!

दरम्यान, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र कऱ्हा नदी पात्रातील वाढलेलं पाणी पाहण्यासाठी बारामती येथील कसबा पुलावर मोठ्या प्रमाणात नागरीक गर्दी करत आहे. यामुळे संभव्य धोका लक्षात घेता बारामती नगर परिषदेकडून नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. बानपच्या कचरा घंटागाडीमधील भोंग्याच्या सहाय्याने नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *