बारामती, 14 ऑक्टोबरः बारामती तालुक्यात माळेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने माळेगावसह परिसरात दोन ठिकाणी अवैध हातभट्टीची दारूविक्रेत्यावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 33 हजार 600 रुपये किमतीची 420 लीटर दारू नष्ट करून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ट्रॅक्टरचा भीषण अपघात; तीन महिला ठार
दरम्यान, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास साळवे, पोलीस कॉन्स्टेबल सादिक सय्यद, जयसिंग कचरे, सागर शिंदे, ज्ञानेश्वर मोरे यांना सदर अवैध धंद्यासंदर्भात माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे हॉटेल शिवशाहीच्या मागे पत्राशेडमध्ये गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या चेतन जाधव (रा. माळेगाव, ता. बारामती) व राहुल राठोड (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करून 24 हजार रुपयांची 300 लीटर दारू नष्ट केली.
जखमी जनावरांवर प्राणी मित्रांकडून तात्काळ उपचार
यासह माळेगाव येथील चव्हाण वस्ती येथे विठ्ठल चव्हाण (रा. चव्हाण वस्ती, माळेगाव) याच्यावर कारवाई करत त्याच्या ताब्यातील 9 हजार 600 रुपये किमतीची 120 लीटर गावठी हातभट्टीची दारू नष्ट केली. तसेच तो संतोष राठोड (रा. जेजुरी, ता. पुरंदर) यांच्याकडून दारू विक्रीसाठी आणत होता, अशी माहिती मिळाली आहे.
2 Comments on “माळेगावात अवैध धंद्यांवर धडक कारवाई”