ट्रॅक्टरचा भीषण अपघात; तीन महिला ठार

दौंड, 13 ऑक्टोबरः दौंड तालुक्यातील रावणगाव येथे आज, 13 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यापैकी तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दौंडसह भिगवण येथील दवाखान्यात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमी जनावरांवर प्राणी मित्रांकडून तात्काळ उपचार

सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊ पानसरे व अश्विनी प्रमोद आटोळे अशी मृत महिलांची नावे आहेत. यातील सुरेखा आणि रेश्मा या सख्ख्या जावा होत्या. टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून सदर अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या महिला या ट्रॉलीखाली सापडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

शेतकऱ्यांना पशुधन विकास अधिकाऱ्यांचे आवाहन

टोमॅटोचे 75 ते 80 क्रेट यामध्ये होते. टोमॅटो घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना खडकवासला कालव्याच्या 32 व्या क्रमांकाच्या वितरीकेवरून निघाला होता. त्यामध्ये चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला. त्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये एकूण नऊ महिला होत्या. या महिला रावणगाव परिसरातील होत्या. उपचारादरम्यान यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

One Comment on “ट्रॅक्टरचा भीषण अपघात; तीन महिला ठार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *