बारामती, 13 ऑक्टोबरः दिवाळी हा सण काही दिवसांवर आला आहे. कोरोना काळानंतर यंदा दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होणार असून यासाठी बाजारापेठाही सज्ज झाल्या आहेत. यंदा अनेकांची पसंती ही नवीन खरेदीकडे राहणार आहे. मात्र असे काही गरजू लोक आहेत, ज्यांच्याकडे एक वेळ जेवणाची सोय मोठ्या शर्तीने होत असते, घालायला व्यवस्थित कपडे नसतात.
मुर्टीमधील पावसाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!
अशा गरजू आणि गरीब लोकांना आपण सहाय्यता करू शकतो. यासाठी बारामती नगर परिषद आणि अजिंक्य संस्था बारामती यांच्या वतीने बारामतीत दान उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दान उत्सवात आपल्याकडील जुने सुस्थितीमधील सर्व साईजचे कपडे, ब्लँकेट्स, स्वेटर्स, स्कूलबॅग्ज, पुस्तके, खेळणी आदी वस्तू दान करू शकता. दान केलेले सर्व कपडे आणि वस्तू गूंज या एनजीओ मार्फत गरजू बांधवांना देण्यात येणार आहे.
गैरवर्तणूक करणाऱ्या दुकानदारावर कारवाईची मागणी
बारामती शहरात नगर परिषदेसमोरील तीन हत्ती चौक, भिगवण रोडवरील सिटी इन चौक आणि मोरगाव रोडवरील नंदन पेट्रोल पंप या तीन ठिकाणी रविवारी, 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत आपणाकडील सुस्थितीतील कपडे आणि वस्तू दान करू शकता. अधिक माहितीसाठी 8208107200/9850640996/9607610678/8623839900/9112903424 या क्रमांकांवर संपर्क करू शकता.