फळपिक विम्यासाठी बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन

बारामती, 12 ऑक्टोबरः प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2022-23 आंबिया बहार मध्ये आंबा, डाळिंब, द्राक्ष व केळी या फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना आहे. तालुक्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छीक आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा सरंक्षणाचे कवच लागू राहणार आहे. नुकसान भरपाई महावेध प्रकल्पातंर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या आकडेवारी नुसार ठरविण्यात येते.

तहसिलदार पाटील यांचे शिधापत्रिका धारकांना आवाहन

बारामती तालुक्यातील समाविष्ट महसूल मंडळातील आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2022 आहे. विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम 15 हजार 400 रुपये इतकी आहे.

डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत 14 जानेवारी 2023 असून विमा संरक्षित रक्कम 1 लाख 30 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम 9 हजार 750 रुपये इतकी आहे.

एमआयडीसीमधील उद्योजकांचे प्रश्न सोटणार!

द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2022 असून विमा संरक्षित रक्कम 3 लाख 20 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम 16 हजार रुपये इतकी आहे.

केळी फळपिकासाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2022 असून विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम 7 हजार रुपये इतकी आहे.

विशेष महिला ग्रामसभेचे भिलारवाडीत आयोजन

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आंबिया बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल https://pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अधिक माहितीसाठी भारतीय कृषि विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800 419 5004, भ्रमणध्वनी 8010712575 या क्रमांकावर व संबंधित मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *