तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

दौंड, 11 ऑक्टोबरः दौंड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला सातबाऱ्यावरील ब्लॉक काढण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामतीत ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त पाणी, फ्रुटी, बिस्कीटचे वाटप

तुषार शिंदे (वय- 34) असे या दौंड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची पुनर्वसित वाटप झालेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील भोगवटा वर्ग 2 हा शेरा कमी करून भोगवटा वर्ग 1 या शेऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि सातबाऱ्यावरील ऑनलाइन ब्लॉक काढण्यासाठी महसूल सहाय्यक तुषार शिंदे यांनी 5 हजार रुपयांची मागणी संबंधित शेतकरी यांच्याकडे केली होती.

बारामतीत हजरत महंमद पैगंबर जयंती उत्साहात साजरी

तडजोडीअंती शिंदे यांना 4 हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)कडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी, 10 ऑक्टोबर 2022 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली असता शिंदे याने लाच मागितल्याचे दिसून आले.

त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार कार्यालयात सापळा रचून महसूल सहाय्यक तुषार शिंदे याला 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *