इंदापुरात रासपचे शक्ती प्रदर्शन

इंदापूर, 8 ऑक्टोबरः इंदापूर तालुक्यातील रुई-बाबीर येथे बुधवारी, 12 ऑक्टोबर 2022 रोजी पिण्याच्या पाण्याची टाकी आणि पाईप लाईनचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर पिण्याच्या पाण्याची टाकी आणि पाईप लाईनचा लोकार्पण राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या निमित्ताने इंदापूर तालुका रासपचा मेळावा रुई-बाबीर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किरण गोफणे यांनी दिली.

माळेगावात मटका अड्ड्यावर मोठी धाड

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आमदार निधीतून रुई-बाबीर येथे कामे झाली आहेत. बाबीर देवस्थानाला मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने पाईप लाईन व 32 हजार लिटरची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. त्याच्या लोकार्पणाचा सोहळा व रासपचा मेळावा रुई-बाबीर येथे होणार आहे.

शेटफळ हवेली येथील आधार व एल्गार सभा दणक्यात

यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल मेमाने, रासप नेते सतीश तरंगे, तालुकाध्यक्ष तानाजी मारकड, तालुका संघटक तानाजी शिंगाडे, युवक तालुकाध्यक्ष आकाश पवार, शैलेश थोरात, अविनाश मोहिते, अतुल शिंगाडे, सोन्या जानकर, तसेच तालुक्‍यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *