बारामतीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

बारामती, 6 ऑक्टोबरः बारामती तालुक्यातील मेडद गावाच्या हद्दीतील एका शेताच्या बांधालगत लिंबाच्या झाडाखाली अंदाजे 60 वर्षांच्या अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुई ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात हृदय विकारच्या झटक्याने सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या बारामती शहराध्यक्षपदी जय पाटील यांची वर्णी

बारामती-मोरगाव रस्त्यालगत असणाऱ्या शेतात बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 च्या सुमारास महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मेडद गावाचे पोलीस पाटलांनी माळेगाव पोलीस ठाण्यात या बाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत आकस्मिक मृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या महिलेची ओळख पटविण्यासाठी माळेगाव पोलिसांनी ग्रामस्थांशी संपर्क साधला. मात्र अजूनही मृत महिलेची ओळख पटलेली नाही.

मृत महिलेचे केस पांढऱ्या व काळे रंगाचे असून, नाकात पांढऱ्या धातूची नथ, उजव्या हातामध्ये सहा काचेच्या हिरव्या बांगड्या व एक हिरव्या रंगाची पाटली, तसेच मृत महिलेच्या कपाळावर लाल रंगाची टिकली आहे. फिकट बदामी रंगाची व काळे फुले असलेली हिरवा, निळा, कडा असलेली साडी व राखडी रंगाचा ब्लाऊज घातलेला दिसत आहे. तसेच मृत महिलेच्या जवळ कातड्याच्या चप्पल मिळून आल्या आहेत. वरील वर्णानाची मृत महिलेबाबत ओळख पटल्यास माळेगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *