राष्ट्रवादीच्या बारामती शहराध्यक्षपदी जय पाटील यांची वर्णी

बारामती, 6 ऑक्टोबरः बारामती नगर परिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक 2022 तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मोठे बदल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून पक्षातील तरुण पिढीला संधी देण्याचे काम सध्या दिसत आहे.

बारामती सत्र न्यायालयाचा पोलीस अधिकाऱ्यांना मोठा दिलासा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांचा कार्यकाल संपल्यानंतर नव्याने पदाधिकारी निवड होणार होती. शहराध्यक्ष पदी प्रत्येक जण आपली वर्णी लागावी म्हणून धडपड सुरु होती. त्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे शहरातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या फेऱ्यादेखील वाढल्या होत्या. मात्र यंदा राष्ट्रवादीने नवीन चेहऱ्यांना संधी देत शहराध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष जय पाटील यांची वर्णी लावली आहे.

जय पाटील हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्ष आहेत. संयमी आणि मितभाषी असल्याने अजित पवार यांनी त्यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावीपणे करणार असल्याचे जय पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *