पुणे स्टेशनवर मोठी दुर्घटना; उच्च दाब विद्युत तारेला तरुणाचा स्पर्श

पुणे, 3 ऑक्टोबरः पुणे स्टेशनवर शनिवारी,1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 च्या सुमारास एक मोठी दुर्घटना घटली आहे. प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या पुणे-गोरखपूर एक्सप्रेस रेल्वेच्या छतावरून एक तरुण आत्महत्या करण्याच्या हेतून धावतानाचा हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे.

बारामती नगर परिषद देशात नववी

या व्हिडीओमध्ये एक तरुण रेल्वे वरून धावाताना दिसत आहे. मात्र काही वेळातच त्या तरुणाचा स्पर्श रेल्वेच्या विद्युत तारेला झाला. या तारेला स्पर्श होताचा एका मागे एक असे दोन स्फोट होऊन तो तरुण प्लॅटफॉर्मवर खाली कोसळला. या स्फोटामुळे प्लॅटफॉर्मवर एकच गोंधळ उडाला आहे.

 

सदर तरुणाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर सध्या उपचार सुरु आहे. या घटनेत तरुण 80 टक्के भाजला आहे. दरम्यान, सदर तरुणाला रेल्वे पोलीस आणि प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांकडून खाली उतरण्यासाठी वारंवार सांगण्यात येत होते. गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचे नाव गोवर्धन मल्ला (वय-33, रा. कटक, राज्य-ओरिसा) आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *