बारामती, 30 सप्टेंबरः बारामती शहरासह तालुक्यात प्रतिष्ठेची मानल्या जाणारी बारामती प्रीमियर लीग (BPL)-4 ला लवकरच सुरुवात होणार आहे. या आधी आयपीएलच्या धरतीवर BPL- 4 मधील सहभागी घेतलेल्या खेळाडूंचे ऑक्शन उद्या 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 पासून शहरातील बारामती क्लबमध्ये होणार आहे. या BPL-4 च्या ऑक्शनचे थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्हवर होणार आहे.
बारामतीत आरटीओ वसुलीचे टार्गेट पुर्ण?
टेनिस बॉलवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या BPL-4 स्पर्धेत बारामती शहरासह तालुक्यातील खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. या BPL-4 ऑक्शनमध्ये 16 संघांकडून बोली लावली जाणार आहे. ऑक्शनमध्ये यंदा सर्व संघांकडे 17000 पॉईंट्स असणार आहेत. या आधी काही संघांकडून एका चॉईस प्लेअरसाठी 3000 पाईंट्स मोजले आहेत. त्यामुळे काही संघाचे पॉईंट्स कमी जास्त आहेत.
पुणे जिल्ह्यातील पोलीस प्रतिमा जनसामान्यात मलीन
यंदाच्या BPL-4 स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी तालुक्यातून तब्बल 265 खेळाडूंनी अर्ज भरला आहे. या 265 खेळाडूंसाठी उद्या 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 पासून 16 संघ मालक बोली लावणार आहे. या 16 संघात कोणत्या खेळाडूला अधिक बोली लागते हे उद्याच समजणार आहे. सदर BPL-4 च्या ऑक्शनची लिंक उद्या ‘भारतीय नायक’ वर देण्यात येणार आहे.