कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

बारामती, 28 सप्टेंबरः(प्रतिनिधी- शरद भगत) रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बारामती तालुक्यातील मुर्टी येथे 22 सप्टेंबर 2022 रोजी मिरवणूक काढण्यात आली. तसेच 27 सप्टेंबर 2022 रोजी मुर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

बारामती नगर परिषदेकडून माहिती अधिकार दिवस साजरा

या शाळेत रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य ‘स्वावलंबी हेच आमचे शिक्षण’ असे असून यामध्ये विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. तसेच जयंतीनिमित्त शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप देखील करण्यात आले.

बारामतीत माळावरची देवीचे सुप्रिया सुळेंनी घेतलं दर्शन; मात्र..

यावेळी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आले. मुर्टी गावचे पत्रकार आणि विद्यालयातील माजी विद्यार्थी शरद भगत यांनी यावेळी इयत्ता 6 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला गणवेश दिला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य प्राचार्य असोसिएशन अध्यक्ष नंदकुमार निकम, जनरल बॉडी सदस्य लालासाहेब नलवडे, पश्चिम विभागचे सहायक विभागीय अधिकारी अशोकराव जगदाळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक शिवाजीराव भाडळे, रयत शिक्षण संस्था साताराचे जनरल बॉडी सदस्य आर .व्ही. जगदाळे, मुर्टी गावचे उपसरपंच किरण जगदाळे यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *