बारामतीत माळावरची देवीचे सुप्रिया सुळेंनी घेतलं दर्शन; मात्र..

बारामती, 28 सप्टेंबरः बारामतीसह देशभरात सध्या नवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. नऊ देवींचे नऊ दिवस म्हणून नवरात्र साजरी करण्यात येते. या नवरात्री उत्सवाला हिंदूंसह इतर समाज बांधवात अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळेच अनेक राजकीय पुढारी हे सणोत्सवाच्या काळात देव-देवी दर्शनासाठी जात असतात.

सुपे गावात सिमेंटचे रस्ते

बारामतीतही असंच घडल्याचं चित्र 27 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास दिसलं. बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीची प्रसिद्ध माळावरची देवी आई तुळजाभवानी देवीचे काल, मंगळवारी रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास दर्शन घेतलं. समाज माध्यमांवर खासदार सुप्रिया सुळे या नेहमी सक्रिय असतात. सध्या त्या बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यात नुक्कड बैठका घेताना दिसत आहे. तसेच नवरात्री उत्सवनिमित्त स्थानिक देवीच्या दर्शनास न चुकता जातानाचे फोटो आणि व्हिडीओ त्यांच्याच फेसबुकवर अपलोड केलेले आहेत.

मात्र बारामतीमधील माळावरची देवीच्या दर्शन घेतल्यानंतरचे फोटो सुप्रिया सुळेंनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर अपलोड केलेत. मात्र या वरून त्यांच्यावर नेटकरांनी टिका करत ट्रोल करताना दिसत आहेत.

निर्मला सितारमण यांचा बारामती दौरा एक अयशस्वी प्रयत्न?

दरम्यान बारामती लोकसभा मतदार संघात भाजपने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यामुळे ऐन सण उत्सवाच्या काळात सुप्रिया सुळे या जनतेत जाण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे चित्र यावरून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *