बारामती, 27 सप्टेंबरः बारामती तालुक्यातील सुपे गावातील अण्णाभाऊ साठे नगरमधील रस्त्याच्या सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
सुपे गावातील अण्णाभाऊ साठे नगर येथे अंतर्गत सुमारे 170 मिटर सिमेंट काँक्रेटीकरणाचा रस्ता आहे.
निर्मला सितारमण यांचा बारामती दौरा एक अयशस्वी प्रयत्न?
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सुचवलेल्या नागरी सुविधा निधी सन 2021-22 मधील साठे नगर मधील अंतर्गत सुमारे 15 लाख रुपये खर्चाचा काँक्रेटीकरणाचा रस्ता करण्यात आला आहे.
याप्रसंगी उपसरपंच मल्हारी खैरे, अनिल हिरवे, अमोल बारवकर, रोहन सरोदे आदींनी कामाची पहाणी केली. या रस्त्यासह इतरही सुचवलेली भुमिगत गटर, सिमेट काँक्रेटीकरण, डांबरीकरण आणि खडीकरण असे एकूण 27 पद्धतीची सुमारे दीडकोटी रुपये खर्चाची कामे 70 टक्के पुर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे ऑक्टोबर अखेर पुर्ण होतील, अशी माहिती सरपंच स्वाती हिरवे आणि ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी दिली.