बारामती, 27 सप्टेंबरः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या बारामती लोकसभेचा गड जिंकण्यासाठी 22, 23 आणि 24 सप्टेंबर बारामतीमध्ये लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी येऊन गेले. या दौर्यात त्यांनी विविध कार्यक्रमात संवाद परिसंवाद घेतले. परंतु त्या संवादाचा परिसंवादाचा फायदा निवडणुकीत आणि पक्ष संघटनेत कितपत होईल, याची शंका सर्वसाधारण सामान्यांच्या मनात आहे.
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
खडकवासला आणि दौंड विधानसभा मतदार सोडता इतर चार मतदारसंघ कार्यक्रम हे नेतृत्व आभावी यशस्वी झाले, असे राजकीय निरीक्षकांच्या मत आहे. भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर या विधानसभा क्षेत्रात भाजपाला सक्षम नेतृत्व निर्माण करता आलेले नाही, हे सिद्ध होत आहे. तरी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या माध्यमातून उसनं अवसान आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा दौऱ्यात दिसून आले. बारामतीमध्ये तर हातावरची बोटे मोजण्याइतकी उपस्थिती असते, याचे पत्रकारांनी सांगितले. या दौऱ्याने पक्ष संघटनेला मात्र काही दिले नाही, हे नक्की. केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांचा हा संवाद यात्रा विसंवाद होऊ नाही? म्हणजे झाले.