बारामतीत दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यासाठी आंदोलन

बारामती, 23 सप्टेंबरः बारामती नगर परिषदेसमोर आज, 23 सप्टेंबर 2022 रोजी दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी प्रहार संघटना प्रणित प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी दिव्यांग बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सदर मागण्याचे निवेदन बानपचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना देण्यात आले.

निवेदनात दिलेल्या प्रमुख मागणीनुसार, बारामती शहरातील नगर परिषदेच्या मालकीचे न मिळालेले राखीव 5 टक्के गाळे हे दिव्यांग बांधवांसाठी व्यवसाय करण्यासाठी त्वरीत द्यावेत, शासनाने दिव्यांगांसाठी दिलेला 5 टक्के निधी हा दिव्यांगांसाठी 100 टक्के खर्च करावा, नगर परिषदेच्या हद्दीमधील बेघर, भूमीहीन दिव्यांगांसाठी नगर परिषदेमार्फत घरकुलाची योजना आखावी या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

बारामती नगर परिषदेच्या हद्दीत दिव्यांगांसाठी ज्या काही योजन आहेत, ते बानपकडून राबवत आलो आहे. प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या मागण्या रास्त असून लवकरच या मागण्यांसंदर्भात एक समिती गठीत करणार आहे. तसेच या समितीद्वारे इतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी आणि अंमलबजावणीसाठी चर्चा करणार असल्याचे बानपचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी ‘भारतीय नायक’ला सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *