बारामती, 20 सप्टेंबरः बारामती तालुक्यात नव्याने उदयास आलेली माळेगाव नगर पंचायतीचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. या विकास आराखड्यात नवीन पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन व अंतर्गत गटारींसाठी तब्बल 135 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
बारामतीत भटक्या जनावरांचे साम्राज्य!
माळेगाव नगर पंचायत हद्दीत काही दिवसांत दीड कोटी रुपयांची विकास कामे सुरू होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली. दरम्यान, अवघ्या दहा महिन्यांत माझी वसुंधरा अभियानात राज्यात तिसरा क्रमांक मिळवून 1 कोटी रुपये बक्षीस मिळाल्याबद्दल सार्थ अभिमान वाटत असल्याचेही मुख्याधिकारी काळे यांनी पत्रकारांना सांगितले.
डेंग्यूने घेतला बारामतीमधील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा बळी
यावेळी मुख्याधिकारी स्मिता काळे म्हणाल्या, बौद्ध नगर समाज मंदिर सुशोभीकरण, सुसज्ज अभ्यासिका, थिएटर शेजारील सार्वजनिक शौचालय अशी दीड कोटी रुपयांची कामे सुरू करणार आहे. शासन दरबारी 27 पदे मंजूर असताना ती भरली नाहीत. दरमहा कामगार पगार, दैनंदिन खर्च यासाठी महिना साडेपाच लाख रुपये खर्च होत आहे.