बारामती शहराला दिवसाआड होणार पाणी पुरवठा

बारामती, 19 सप्टेंबरः बारामती नगर परिषदेकडून शहरातील नागरीकांना पाण्यासंदर्भात जाहीर आवाहन करण्यात आले आहे. शहराला होणारा पाणी पुरवठा हा एक दिवसाआड बंद ठेवणार असल्याचे नगर परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून निरा डावा कालव्यामधील प्रवाह बंद झाल्याने तसेच उपलब्ध पाण्याचा साठा असल्याने एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले आहे. सदर पाणी पुरवठ्याचे नियोजन हे पुढील प्रमाणे आहे.

बारामती प्रशासकीय भवनात घाणीचं साम्राज्य; ठेकेदार गायब?

बुधवार, 21 सप्टेंबर 2022 रोजी कोष्टी गल्ली, श्रावण गल्ली, क्षत्रियनगर, मेडद रोड, प्रतिक्षा नगर, महादेव मळा, सद्गुरु नगर, अवती शैक्षणिक कॉलनी, वसंत नगर, अवधुत नगर कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंद नगर, म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा गल्ली, समर्थ नगर यासह आमराईमधील विठ्ठल नगर, सुहास नगर, चंद्रमणी नगर सोसायटी, कोर हाऊस, इंदापूर रोड, सटवजीनगर आदी भागात पाणी पुरवठा होणार नाही, तद्नंतर दिवसाआड पाणी पुरवठा होईल.

गुरुवार, 22 सप्टेंबर 2022 रोजी कचोरी रोड, छत्रपति शिवाजी महाराज मार्ग, हंबीर गल्ली महावीर भवन पाठी मागे, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड पेठ, तांदळवाडी रोड, संपूर्ण कासबा, लक्ष्मीनारायण नगर, मालेगाव रोड, जमदार रोड, खंडोबा नगर, जवाहर नगर, पोस्ट रोड, विजय नगर, गणेश नगर, अकल्पित सोसायटी, अशोक नगर, आनंद नगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवन रोड, सिद्धार्थ नगर आदी भागात पाणीपुरवठा होणार नाही तर नंतर दिवसाआड पाणीपुरवठा होईल. या प्रमाणे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करावा. तसेच पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करण्याचे आवाहन बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *