बारामतीत राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक संपन्न

बारामती, 10 सप्टेंबरः राज्य कामगार विमा महामंडळाची बारामतीमध्ये नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीत राज्य कामगार विमा महामंडळाने लाभार्थ्यांना विम्याच्या लाभ वितरण केले. तसेच बारामती परिसरात असंघटित कंत्राटी कामगारांसाठी असलेले योजनेचा लाभ कामगारांनी घ्यावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.

या योजनेत कामगारांना आजारपण आल्यास, अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास ही पेन्शन योजना लागू होते. लाभार्थ्यांना किंवा त्यांच्या वारसांना मरेपर्यंत या पेन्शनचा लाभ मिळतो. ईएसआयसी (ESIC)च्या बारामती मधील आश्रित हितलाभ प्रकरणांपैकी काही प्रकरणांचा आढावा:-
1.कै. बाळू गोसावी ईएसआयसी विमा नं.3312969542 कंपनी- सोनाई डेअरी, इंदापूर. ईएसआयसीकडे मृत बाळू गोसावी यांचे फक्त 586 रुपयांचे योगदान दिले आहे. तरीही त्यांच्या कुटुंबियांना प्रति महिना 15283 रुपये एवढी पेन्शन संपूर्ण आयुष्यभरासाठी मिळणार आहे.
2. कै. सोपान देशमुख ईएसआयसी विमा नं.3311246666 कंपनी-ट्रान्स मेक सिस्टिम्स, एमआयडीसी, बारामती. ईएसआयसी योगदान-फक्त 3249 रुपये आणि पेन्शन 12462 प्रति महिना आयुष्यभरासाठी.
3.कै. रामकृष्ण कुलकर्णी विमा नं.3311155742 कंपनी-सोनाई कॅटल फीड्स, इंदापूर. ईएसआयसी योगदान 3725 रुपये, मिळणारे पेन्शन 14477 रुपये प्रति महिना आयुष्यभरासाठी.

अपघात झाल्यानंतर मृत्यू झाला नसेल तर-
विमा कामगाराला अपघातामुळे जेवढे दिवस सुट्टी घ्यावी लागेल, त्याच्या पगाराच्या 90 टक्के पगार ईएसआयसी करते. तसेच अपघातामुळे कायमस्वरूपीचा अपंगत्व आले असेल, तर त्या कामगाराला त्यांच्या अपंगत्वाच्या गंभीरतेनुसार आयुष्यभरासाठी पेन्शन मिळते. अलीकडेच अपंगत्व पेन्शन चालू झालेले बारामतीमधील कामगार
1. योगेश मदने विमा नं-3312502409 कंपनी- व्हेंचुर स्टील्स, एमआयडीसी, बारामती
2. आकाश शिंदे, विमा नं-3308353690 कंपनी- महालक्ष्मी लेबर सप्लाअर्स (काम-पियागिजो कंपनी) बारामती.
सदर माहिती सांगण्याचा उद्देश हा की, कामगाराचा अपघात झाल्यानंतर ईएसआयसी एवढे फायदे देत असताना काही कंपनी कामगाराचा अपघात फॉर्म भरत नाहीत, आणि भरलाच तर त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करत नाहीत. त्यामुळे खूप कामगार ईएसआयसीच्या फायद्यापासून वंचित राहतात.

बावनकुळेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा टोला

ईएसआयसी ब्रँच ऑफिस बारामती कडून सर्व कामगारांना विनंती आहे की, कामगाराचा अपघात झाला तर लगेच 48 तासांत ऑनलाईन फॉर्म भरून त्याची प्रत कंपनीच्या सही शिक्यासह लवकरात लवकर ब्रँच ऑफिस बारामतीमध्ये जमा करावे. ईएसआयसी विमा असलेल्या आणि कंपनीमध्ये काम करताना किंवा कामासाठी येत असताना अथवा काम करून घरी जाताना अपघात होऊन कामगाराचा मृत्यू झाला, तर ईएसआयसी अशा मृत कामगारावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना पूर्ण आयुष्यासाठी (मुलीला लग्न होईपर्यंत व मुलाला वयाच्या 25 वर्षापर्यंत) कामगाराला मिळणाऱ्या पगाराच्या 90 टक्के पेन्शन देते.

ईएसआयसी आजारपण लाभ, अपंगत्वाला अवलंब मातृत्वाचा लाभ, वैद्याला तसेच इतर दिले जाणारे इतर लाभ पुढील प्रमाणे-
प्रस्तुती खर्च
आणि विशिष्ट खर्च
व्यावसायिक पुनर्वसन
शारीरिक पुनर्वसन
बेरोजगारी भत्ता व कौशल्य उन्नवन प्रशिक्षण

सदर योजनेमध्ये मुलींच्या लग्नाला वय विशिष्ट रक्कम आदा केली जाते. विमा अधिकाऱ्यांनी पोलीस वितरण वेळ माहिती वितरणाच्या वेळी ही माहिती दिली आहे. कंत्राटी कामगारांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन शाखाप्रमुख कैलास रैइगड, सहकर्मी प्रकाश गुजरे, जिनेन्द्र खाणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *