बारामतीतील प्रसिद्ध सोन्याच्या दुकानात चोरी

बारामती, 4 एप्रिलः  बारामतीतील प्रसिद्ध सोन्याच्या दुकानात दिवसाढवळ्या चोरीची घटना झाल्याची माहिती समोर येत आहे. शहरातील कचेरी रोडवरील सुप्रसिद्ध चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. या दुकानात सुमारे 4 लाख रुपयांच्या दागिना लंपास झालेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सदर घटना ही पाडव्याच्या दिवशी झाली आहे. सदर चोरीची माहिती सीसीटीव्हीतून उघड झाली आहे.

दरम्यान, बारामती शहरातील चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. गुढी पाडव्याच्या दिवशी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत दोन महिला आणि एका पुरुषाने सोन्याच्या गंठणावर हाथ सफाई करत 72 ग्रॅमचे सुमारे 4 लाख रुपये किंमतीचे गंठण चोरले. सदर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या चोरी बाबत बारामती शहर पोलिसात तक्रार दिली आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *