बारामती, 9 सप्टेंबरः बारामती शहरात मोठ्या भक्ती भावाने आज, 9 सप्टेंबर 2022 रोजी लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. या गणेश विसर्जनासाठी शहरात ठिकठिकाणी नगर परिषदेच्या वतीने कुत्रिम जलकुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरात गेल्या 9 दिवसांत गणेश उत्सव काळात शहर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं चोख बंदोबस्त दिला. यानंतर आज, (शुक्रवारी) गणेश विसर्जनासाठी बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना गणेश मिरवणुकीत डान्स करण्याचा मोह आवरला नाही. सध्या पोलिसांचा डान्स करण्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.