बारामती नगर परिषदेचे गणेश भक्तांना आवाहन

बारामती, 9 सप्टेंबरः बारामती शहरासह हद्दीत विविध ठिकाणी नगर परिषदेमार्फत कृत्रिम जलकुंड उभारण्यात आलेले आहेत. सर्व गणेश भक्त नागरिकांनी सहकार्य करून आपल्या जवळच्या विसर्जन जलकुंडात बाप्पाचे विसर्जन करावेत, असे आवाहन बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

अजित पवारांनी घेतली नाना पाटेकरांची भेट

कुत्रिम जलकुंभाच्या व्यवस्थेचे ठिकाणी-
1) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदूळवाडी, 2) चिंचकर शाळा तांदूळवाडी, 3) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर, 4) कवी मोरोपंत शाळा श्रीराम नगर, 5) संभाजी नगर कमानी जवळ, 6) बयाजीनगर पेट्रोल पंप, 7) रुई क्षेत्रीय कार्यालय समोर, 8) अभिमन्यू कॉर्नर (बनकर वडेवाले जवळ), 9) सूर्यनगरी मंडई शेजारी अंगणवाडी, 10) सिटी इन चौक, 11) जळोची क्षेत्रीय कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 12) माळावरची देवी मंदिरालगत, 13) गणेश मंदिरासमोर सायली हिल, 14) बारामती सहकारी बँकेशेजारी सम्यक गारमेंट्स भिगवण रोड, 15) ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय कॅनॉल शेजारी, 16) वीर गोगदेव मंदिराजवळ, 17) रिंग रोड कॅनॉल पुलाजवळ, 18) मोरगाव रोड ढवाण शाळा जुने ठिकाण, 19) खरेदी-विक्री पेट्रोल पंप शेजारी खंडोबानगर चौक, 20) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदानगर, 21) जिल्हा परिषद शाळा सातववस्ती, 22) बालकल्याण केंद्र प्राथमिक शाळा मुक्ती टाऊनशिप, 23) बानप शाळा क्रमांक 2 कसबा, 24) धों.आ. साताव शाळा जगतापमळा, 25) मूकबधिर शाळा कारभारीनगर कसबा, 26) शाहू हायस्कूल पाटस रोड, 27) क्षत्रियनगर समाज मंदिर, 28) ख्रिश्चन कॉलनीलगत टकार कॉलनी, 29) तीन हत्ती चौक, 30) तुपे बांगला समोर, 31) कै. वस्ताद बाजीराव काळेनगर स्वागत कमान, 32) अशोक नगर पंचायत समितीसमोर भारत बेकरी, 33) हरिकृपा नगर बोबडे हॉस्पिटल शेजारी, 34) परकाळे बांगला, 35) दशक्रिया विधी घाट कसबा, 36) माता रमाई भवन, 37) सावित्रीबाई फुले समाज मंदिर, 38) फलटण रोड राजगड हाईट्स गाळा नंबर 6, 39) गावडे हॉस्पिटल शेजारी देवळी इस्टेट मंगल कार्यालय, 40) काशीविश्वेश्वर मंदिर शेजारी अशी एकूण 40 कुत्रिम जलकुंडांची व्यवस्था बारामती नगर परिषदेकडून करण्यात आली आहे.

नगरपालिकेने सोय केलेल्या विसर्जन कुंडातच गणपती विसर्जन करून सहकार्य करा, निर्माल्य हे निर्माल्य पेटीत द्या, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *