बनावट पत्राच्या आरोपातून सोहेल शेख यांना सोडण्यासाठीचा अहवाल दाखल

बारामती, 7 सप्टेंबरः बारामतीमधील मदरसा दारुल उलूम मौलाना युनिसियाचे ट्रस्टी सलीम फकीरमहम्मंद बागवान यांनी दिनांक 05 मार्च 2021 रोजी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये सोहेल गुलमहम्मंद शेख यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली होती. फिर्यादीनुसार सोहेल शेख यांनी माजी उद्योग मंत्र्यांच्या नावाचे बोगस पत्र बनवून सलीम दस्तगीर बागवान यांचे एमआयडीसी बारामती येथील भूखंड बळकावले. परंतु तपासानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनने बारामती न्यायालय येथे दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी सीआरपीसी 169 प्रमाणे आरोपी केलेल्या सोहेल शेख यांना आरोपामधून सोडण्यास मंजुरी मिळणे कामी अहवाल दाखल केला.

उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

सीआरपीसी 169 अहवाल प्रमाणे सोहेल गुलमहम्मंद शेख यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा आढळून आला नाही. सदर व्यक्ती सोहेल गुलमहम्मंद शेख यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचे दोषारोप करता येत नाही. यामुळे सोहेल शेख यांना सीआरपीसी 169 प्रमाणे गुन्ह्यातून सोडण्याची मागणी बारामती शहर पोलीस स्टेशनने न्यायालय प्रथमवर्गीय कोर्ट, बारामती येथे अहवाल सादर केला.

कोसळलेले झाड त्वरीत हटविण्याची मागणी

गुन्हा दाखल होण्यापूर्वी सोहेल शेख यांचा तपास मारिन ड्राइव्ह पोलीस स्टेशन येथे झाला होता. सदर पत्राच्या अनुशंघाने मारिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनने सोहेल शेख यांनी दिलेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्याचे आदेश वर्ग केले होते. परंतु भूखंड मालक सलीम दस्तगीर बागवान यांचे आणि सोहेल शेख यांचे घरगुती वाद होते. त्यामुळे सोहेल शेख यांच्या विरुद्ध खोटी फिर्याद दिली. सोहेल शेख यांना बोगस गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे त्यांनी सांगितले.

“मला कायदा व सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता, आहे आणि सदैव राहणार”, असे सोहेल शेख यांनी ‘भारतीय नायक’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *