कोसळलेले झाड त्वरीत हटविण्याची मागणी

बारामती, 7 सप्टेंबरः बारामती तालुक्यात 6 सप्टेंबर 2022 रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे बारामती तालुक्यातील सोमेश्वर मंदिर करंजे येथे पहाटे एक झाड रस्त्यावरच कोसळले आहे. कोसळलेल्या झाडामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे.

बारामतीत भाजप सोशल मीडिया सेलची बैठक संपन्न

या रस्त्यावर सोमेश्वर कारखान्यासह करंजेपुल मुख्य बाजारपेठ, हॉस्पिटल तसेच मोठे शैक्षणिक संकुलन आहेत. यामुळे सोमेश्वर परिसरातील करंजे, देवळवाडी, रासकरमळा, माळवाडी, चौधरवाडी, मगरवाडी, वाकी, चोपडाच, मुटीं या भागातून अनेक लोक, विद्यार्थी-विद्यार्थिनींना याच मार्गाचा अवलंब करावा लागतो. रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे या मार्गावर मधोमध मोठे झाड कोसले आहे. यामुळे या रस्त्याने जा ये करणाऱ्यांना रस्त्याच्या कडेने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. ते झाड संबधित प्रशासनाने त्वरित हटवावे, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *