बारामती कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

बारामती, 5 सप्टेंबरः बारामतीमध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बारामती उपविभागास फळबाग लागवड योजनेसाठी 1,920 हेक्टर फळपिके लागवडीचे लक्ष दिले आहे. ऑगस्ट अखेर 1,237 हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना प्रशासकीय मान्यता आणि 1,334 हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना तांत्रिक मंजूरी मिळाली आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सलग क्षेत्रावर फळबाग व बांधावर फळझाडे लागवडीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित गावातील कृषि सहाय्यकाकडे अर्ज करावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

बारामतीत राष्ट्रीय स्तरीय कलर आणि ब्लॅक बेल्ट डिग्री परीक्षा संपन्न

फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, का.लिंबू, संत्रा, मोसंबी, सिताफळ, नारळ, आवळा, अंजीर, जांभुळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगनफ्रुट, अ‍ॅव्होकॅडो, केळी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. यासह गुलाब, मोगरा व निशीगंध या फुलपिकांच्या लागवडीसाठी सुध्दा परवानगी देण्यात आलेली आहे. अकुशल कामगारांना 256 रुपये प्रति दिन प्रमाणे मजुरीदर आहे.

बारामती शहरातील बस स्थानकाचे होणार तात्पुरते स्थलांतर

रासायनिक खतांचा खर्च आर्थिक मापदंडातून वगळण्यात आला आहे. त्याऐवजी नाडेप कंपोस्ट आणि गांडुळ खताचा अधिक वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. मात्र देय अनुदान आणि फळपीक लागवडीचे निकष विद्यापीठ शिफारशीनुसारच मर्यादित राहील. अतिरीक्त कलमे/रोपे यांचे अनुदान देय राहणार नाही.

लागवड वर्षासह सलग 3 वर्षात मंजुर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहील. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती फळपिकांकरीता जे लाभार्थी 90 टक्के फळझाडे जिवंत ठेवतील आणि कोरडवाहू फळपिकांसाठी 75 टक्के फळझाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील. वैयक्तिक बांधावरील फळपिके लागवडीसाठी हेक्टरी 20 रोपे या मर्यादेत फळपिकांची लागवड ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठीदेखील अनुदान देय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *