निरावागज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरच्या फलकाची विटंबना; निषेधार्थ गाव बंद आणि आंदोलन

बारामती, 14 मे: (अभिजीत कांबळे) बारामती तालुक्यातील निरावागज येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या नावाच्या फलकाची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली असून, या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.14 मे) समस्त आंबेडकरी चळवळीतील नागरिकांच्या वतीने गाव बंद पाळण्यात आला. तसेच सकाळी 10 वाजता निरावागज ग्रामपंचायत कार्यालयासमोर जोरदार निषेध आंदोलनही करण्यात आले.



ही घटना दिनांक 13 मे रोजी सकाळी 9 वाजता निदर्शनास आली. त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील प्रतिनिधींनी माळेगाव पोलीस ठाण्यात निवेदन देत या गंभीर प्रकाराबाबत निषेध आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती.



फलकाची विटंबना ही समाजाच्या भावना दुखावणारी असून, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलनादरम्यान संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवत शांततेत परंतु ठामपणे आपला निषेध नोंदवला. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. तर या घटनेचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *